मुक्ताईनगर तालुक्यात विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यात गौण खनिज उत्खननवर प्रबंध घालत प्रशासनाने कारवाई केल्या परंतु, आता नायगाव ते नंदू पिंपरी दरम्यान कोणत्याही प्रकारची उत्खनन व सपाटीकरण करण्याची तसेच वाहतूक करण्याची परवानगी नसताना सर्रास माती वाहतूक अधिकाऱ्यांच्या आर्थिक सहर्ष आशीर्वादाने तर होत नाही ना ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यात पासून मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गौण खनिज व वाळू वाहतुकी वर सतत कारवाही सुरू असून महसूल प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी गौण खनिज माफियांच्या झोपा उडवल्या तसेच पोलीस प्रशासनाने मोठ्या कारवाई करीत ट्रॅक्टर वाहतूक करीत असताना चालक-मालक सह गुन्हा दाखल करीत महसूलचा दंड ठोठावला असल्याने गौण खनिज माफियांच्या झोपा उडाल्या आहेत. यामुळे त्यांच्यात प्रशासनाचा वचक जो इतक्या वर्षांपासून दिसत नव्हता तो अद्याप तरी दिसून येत आहे. परंतु तालुक्यातील नायगाव ते दरम्यान गेल्या आठ ते पंधरा दिवस झाले स्वतः दिवसा ढवळ्या व रात्री देखील मोठ्या प्रमाणात शेत सपाटीकरण च्या नावाखाली माती एका गटातून दुसऱ्या गटात सहज अधिकाऱ्यांच्या समोर वाहतूक केली जात आहे परंतु अधिकारी बघ्याची भूमिका काखेत आहे की ही बाब महसूल प्रशासनाच्या अधिपत्याखाली येत नाही का की काही आर्थिक सहर्ष अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे तसेच कार्यवाही झालेल्या ट्रॅक्टर यांना वेगळा कायदा व वाहतूक करणाऱ्या जेसीबी सह ट्रॅक्टर यांना वेगळा कायदा शासनाने लागू तर केला नाही ना असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे आतातरी त्यांच्यावर कार्यवाही होणार का तसेच मुक्ताईनगर चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक व तहसीलदार हे त्या जेसीबी व ट्रॅक्टर यांच्यावर कारवाई करणार का की शासनाच्या कोणत्यातरी नियमाच्या पळवाटा शोधीत या माती माफियांना पाठीमागे घालणार असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
मार्च एण्ड च्या कामांमुळे सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्ग व्यस्त असून त्यामुळे आज कारवाई होऊ शकली नाही परंतु यापुढे जर अशीच बाब आढळून आले तर नक्कीच कारवाई करण्यात येईल. निकेतन वाळे, नायब तहसीलदार