जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२१ – शहरातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ असलेल्या महामार्गालगतच्या मोटार गॅरेज टपरीचा पत्रा वाकवून चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी दुकानातून ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
अजिंठा चौफुलीकडून कालिंका माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर युसूफ खान यांचे खान मोटार गॅरेज नावाने पत्र्याच्या टपरी मध्ये गॅरेज आहे. खान यांच्यासोबत आणखी दोन व्यक्ती त्या ठिकाणी व्यवसाय करतात. गुरुवारी सायंकाळी सात वाजता खान नेहमीप्रमाणे गॅरेज बंद करून घरी गेले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या मुलाने कुलूप उघडून आत पाहिले असता दुकानातील गॅरेजचे सर्व साहित्य त्याठिकाणी नव्हते. टपरीचा पत्रा वाकून चोरट्यांनी ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला असून त्यात पान्हे, जॅक, स्क्रू ड्रायव्हरचा समावेश आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.