---Advertisement---
राष्ट्रीय

काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २७ पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालाय. ज्यामध्ये पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये २७ पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

pahalgam attact

दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेनं परिरसरासह पुर्ण देशात खळबळ उडाली आहे. दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटक जखमी देखील झाले आहेत.

---Advertisement---

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना ‘तुम्ही मुस्लिम आहात का?’ असा सवाल केला. पर्यटकांनी नाही उत्तर दिल्यावर दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये चार पर्यटक महाराष्ट्रातील तर दोन पर्यटक पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ एक नंबर जारी केला आहे. कोणत्याही पर्यटकाला काही अडचण असल्यास किंवा अशा काही घटना दिसल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. नंबर – 9596777669 यावर पोलिसांनी संपर्क साधण्यास सांगितलं आहे तर, 9419051940 हा व्हॉट्सअप नंबर आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment