⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | प्रेमसंबंधाच्या आड अल्पवयीन मुलीवर अत्याचार : दोघांविरोधात पोक्सो

प्रेमसंबंधाच्या आड अल्पवयीन मुलीवर अत्याचार : दोघांविरोधात पोक्सो

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । अमळनेर शहरातील अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नंतर त्या आरोपींनी मुलीला धमकावलेहि. या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करून तिला धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. साडेसतरा वर्षीय मुलीचा विवाह ठरला असून ती अठरा वर्षाची असताना तिचा विवाह करण्याचे नियोजन होते मात्र गांधीलपुरा भागातल्या मेहतर कॉलनीतील कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले याने धमकी देवून अत्याचार केल्याची माहिती पीडीतेने आपल्या कुटुंबाला दिली.

त्याला रवी उर्फ रघूभाई घोगले याने मदत केल्याचा आरोप असून तरुण नेहमी धमकी द्यायचा, असेही तक्रारीत नमूद आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले आणि रवी उर्फ रघूभाई घोगले या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह