⁠ 
सोमवार, मे 6, 2024

दहा लाखासाठी १९ वर्षीय विवाहितेचा छळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । माहेरून दहा लाख रुपये आणावे यासाठी १९ वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यात घडली. याबाबत पीडित विवाहितेने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार सासरच्या आठ जणांनाविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे.

एरंडोल तालुक्यातील उमरदे येथील निकिता सुनील घ्यार (वय १९ वर्ष) या तरुणीचा एरंडोल येथून पाच किमी अंतरावरील उमरदे येथे वर्षभरापूर्वी सुनील सोपान घ्यार याच्याशी विवाह झाला. सुनील घ्यार हा एमएसईबी मध्ये जळगाव येथे वायरमन म्हणून कार्यरत आहे. सुनीलसह सासरच्या मंडळींनी निकिता कडे माहेरून दहा लाख रुपयाची मागणी केली पण ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिचा त्यांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला.

सुनिल सोपान घ्यार ( पती), सोपान संपत घ्यार (सासरे ), आशाबाई सोपान घ्यार ( सासू ), सविता सोपान घ्यार ( नणंद ), सर्व राहणार ढोणखेड ता. मौताळा जि. बुलढाणा, नामदेव दगडू घुगे ( मावस सासरे ), सुरेखा नामदेव घुगे ( मावस सासू ), सचिन नामदेव घुगे ( मावस दीर ), सर्व रा. मेहरुण जळगांव, छाया सुरेंद्र नाईक दत्त मंदिर मेहरुण जळगांव यांच्या आरोपी मध्ये समावेश आहे. एरंडोल पोलीस पूढील तपास करीत आहेत.