---Advertisement---
जळगाव शहर गुन्हे

खळबळजनक : रेल्वे ट्रॅकजवळ मृतावस्थेत आढळला चिमुकला!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूललगत रेल्वे ट्रॅकजवळ मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शालमध्ये गुंडाळलेला एक बालक आढळून आला. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून एक तासापासून रुग्णवाहिकेची प्रतिक्षा केली जात आहे.

jalgaon crime 1 1

छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपूल नुकतेच नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकजवळ काही महिन्यांचे बाळ मृतावस्थेत आढळून आले. हातापायाला काळा दोरा, शाल, औषधी आणि दूध पिण्याची बाटली असे सर्व बालकाजवळ पडलेले होते.

---Advertisement---

घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. चिमुकल्याचा मृत्यू कसा झाला, त्याला कुणी फेकले, त्याचे पालक कोण? असे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---