⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

उकाड्याने जळगावकर हैराण ; आजचं तापमान कसं राहणार..

महाराष्ट्रात सर्वत्र उन्हाळ्याची लाट सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त आहे. जळगावात काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे तापमान पारा घसरला होता. परंतु आता पुन्हा तापमानाच्या पारा वाढला आहे. काही ठिकाणी उष्णेतेची लाट येण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केले आहे.

image

जळगावमध्ये काल 1 जून रोजी कमाल 28 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते आणि कमाल तापमान हे 43 अंश सेल्सियस होते. सध्या वाढत्या उकाड्याने जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे.

image 1

आज शुक्रवारी कमाल तापमान हे 42 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 4 ते 5 जून दरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

image 2

दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असून पावसाच्या सरी, तर उन्हाचा कडाका जाणवत आहे. उकाड्यामुळे लोक हैराण झाले असून यापासून कधी सुटका होईल, याची वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्याने पुढील तीन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे.