---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

जळगावात पावसाची रिपरिप सुरूच; या तारखेपर्यंत वाढणार पावसाचा जोर? वाचा IMD चा अंदाज..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झालीय. तर काही ठिकाणी अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून अधूनमधून हलका पाऊस होत आहे. मात्र जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशातच हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली.

rain 1 1 jpg webp

२४ ते ३१ या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हीच स्थिती धुळे व नंदुरबार जिल्ह्यात राहील, अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. सध्या पावसाची रिपरिप असून हा पाऊस केवळ पिकांना जीवदान देण्याइतपत जाणवला. पण, शेतजमिनीची भूक भागवणाऱ्या, विहिरींना पाणी पाझर देणाऱ्या जोरदार पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम आहे.

---Advertisement---

आज राज्यात पावसाची स्थिती काय?
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---