वरणगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जिल्हाधिकार्यांना साकडे
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून 25 रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना 19 सप्टेंबर 2019 रोजी मंजूर केली होती. या पाणीपुरवठा योजनेचे काम जलद गतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची भेट घेवून त्यांना साकडे घालण्यात आले.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे ओएसडी बेडसे, विजय ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बळीराम सोनवणे उपस्थित होते. वरणगाव शहरात कचर्याचे मनमानी पद्धतीने काम सुरू असून प्रशासकीय राजवटीत मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या विकासकांमाच्या अनेक ठेकेदाराच्या तक्रारी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केल्या. जिल्हाधिकार्यांनी मुख्याधिकारी समीर शेख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून माहिती जाणून घेतली. वरणगाव येथे लवकरच जिल्हाधिकारी भेट देणार असून जनतेच्या समस्या ऐकून घेणार असल्याचे सुनील काळे यांनी कळवले असून पाणीपुरवठ्याच्या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकार्यांना दिल्याचेही कळवले आहे.