महाराष्ट्रात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा ; आज तुमच्या जिल्ह्यातील स्थिती कशी राहणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । राज्यात अनेक दिवसापासून गारपीट आणि अवकाळीचं संकट कायम आहे. अनेक ठिकाणी झालेल्या गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही उर्वरित काही जिल्ह्याना गारपिटीसह वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणखीन नुकसान होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
हवामान खात्याने पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी?
आज नाशिक, अहमदनगर, पुणे, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जळगावातील पारा घसरला :
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसापासून दिवसभर काहीसे मळभी ढगाळ वातावरण कायम होते. यामुळे उन्हाचा पारा काहीसा घसरला आहे. 41 अंशावर असलेला पारा बुधवारी 39 अंशावर आला होता. जळगावला 29 एप्रिल पर्यंत येलो अलर्ट देण्यात आल्याने वातावरणीय स्थिती अशीच एक दोन दिवस कायम रहाणार आहे.