थ्रिलर क्राईम : जळगावच्या सोनूला संपवण्यासाठी आली मुंबईची गॅंग!
जळगाव लाईव्ह न्यूज | २२ मार्च २०२३ | कोणत्याही क्रिमिनल थ्रिलर चित्रपटाला लाजवेल अशी घटना जळगाव जिल्ह्यात उघड झाली आहे. या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर एखादा चित्रपटात आहे की काय अशी शंका तुम्हाला येऊ शकते.
अंतुर्ली (ता. पाचोरा) येथील वाळू व्यावसायिक सचिन देविदास पाटील (वय ३६) याचा रविवार (ता. १९) खून झाला. वाळू वाहतूकीच्या अंतर्गत स्पर्धेतून सचिन पाटील उर्फ ‘सोनू’ या वाळूवाहतूकदाराने निलेश देसले या वाळूवाहतूकदाराचा पाय तोडला होता. आपल्या तुटलेल्या पायाचा बदला घेण्यासाठी निलेश देसले यांनी मुंबईच्या स्वामी गॅंगला सचिनच्या हत्येची सुपारी दिल्याचे समोर आले आहे.
ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर महिला निरीक्षक निता कायटे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह फॉरेन्सीक टीम, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एरंडोल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेची तीन पथके गठित करुन घटनास्थळावरूनच तपासाला सुरवात झाली.
सचिन पाटील वर पाळत ठेवून त्याचा पाठलाग करून ही हत्या घडवण्यात आले असल्याचे समोर आले आहे. सचिन पाटील नदी वरून बुलेटने जात असताना समोरून बोलेरो जीपने त्याला धडक दिली वरचा अपघात घडवून आणला नंतर त्याला धारदार शास्त्राने भोसकण्यात आले
सचिन आणि निलेश या दोघांचा वाळूचा व्यवसाय आहे. ठेका मिळाला तर कायद्याने नाही तर बेकायदेशीर अशा प्रकारे हे दोघेही वाळूचा व्यवसाय करतात. दोघांचाही वाळूमध्ये जम बसला आहे. महिला भरापूर्वी दोघांमध्ये हाणामारी झाली होती आणि सचिनने निलेशचा पाय फ्रॅक्चर केला होता. निलेशने स्वामी टोळी यांच्याशी संपर्क साधला आणि स्वामी याला सचिनच्या खुनाची सुपारी दिली.
आता सुपारी दिल्याने स्वामी टोळी ही पंधरा दिवसापासून पाचोऱ्यात थांबली होती. आठ दहा दिवस पाहणी केल्यानंतर ते निघून गेले मात्र या टोळीतले तीन जण म्हणजेच समाधान पाटील शुभम पाटील व सागर कोळी यांनी पाळतीवर ठेवले होते.
रविवारी सचिन नेहमीप्रमाणे पहाटे गिरणा नदीवर वाळूची सर्व कामे करून परत असताना श्रीनिवास स्वामी याला भ्रमणध्वनी वरून सचिन निघाल्याची टीप देण्यात आली. यावरून सचिनचा खून केला आणि पुणे पळ काढला.
गुन्ह्यात वापरलेली जीप कानाळदार रस्त्यावर सापडली. मुंबईच्या टोळ्याने गुन्हा झाल्यावर ही तिथेच सोडून दिली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने जीप व शस्त्रे जप्त केली. त्यावर मालेगाव पासिंग नंबर प्लेट लावली होती.
गुन्हे शाखेने देसले याच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याने आपण जेलमध्ये असताना, श्रीनिवास याला सांगितले होते, पण तो खून करेल याची खात्री नसल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. त्याच्या घरावर पहारा लावला असून, समाधान पाटील व शुभम पाटील यांना अटक केली असून, दोघांना २३ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. सागर कोळी याची चौकशी सुरू आहे. तर मुंबईच्या टोळीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.