⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Thrill : जंगलात पंचनामा करण्यास वनाधिकारी गेले अन् वाघाने फोडली डरकाळी, पंचनामा न करताच भयभीत होऊन ठोकली धूम…

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । वडोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा वनपरीमंडळातील दुई येथील पशुपालक धोंडु डोंगर पाटील यांच्या गोऱ्हावर हल्ला चढवत वाघाने ठार केल्याची घटना २०रोजी घडली. त्याचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या वनाधिकारी गेले त्याचवेळी वाघाने डरकाळी फोडल्याची थरारक प्रकार समोर आला असून पंचनाम्याचे रीतसर सोपस्कार नंतर पार केले जाणार असल्याचे समजते.

वाघाचा मुक्त संचार असलेल्या आई मुक्ताई -भवानी (वडोदा वनक्षेत्र) वनक्षेत्रातील डोलारखेडा वनपरीमंडळातील मौजे दुई येथील पशुपालक धोंडु डोंगर पाटील यांच्या गोऱ्हावर हल्ला चढवत वाघाने ठार केल्याची घटना २० रोजी घडली. त्या अनुषंगाने प्रभारी वनक्षेत्रपाल ए.आर. बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मृत गोऱ्ह्याचा पंचनामा करण्यासाठी व सदर ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यासाठी वनपाल डोलारखेडा पी.टी. पाटील यांच्यासह वनमजुर संजय सांगळकर, धोंडु पाटील, प्रदिप पाटील, हर्षल पाटील, क्रिष्णा पाटील, अनिल पाटील आदी ग्रामस्थ वाघाने शिकार केल्याच्या घटनास्थळी पोहचले. मात्र, मानवी चाहुल लागताच वाघाने जोरदार डरकाळी फोडली. या डरकाळीने सर्वजण भयभयीत झाले. सर्वांची भांबेरी उडाली. घनटाद जंगलातुन पायवाटेवर असलेल्या या सर्व जणांनी जोरदार पळ काढला. वाघाने ठार केलेला गोऱ्ह्याचे मास वाघ नेमकं त्याचवेळी खात असल्याचा अंदाज वनधिकारी यांनी व्यक्त केला. घनदाट ठिकाणी अचानक आलेल्या डरकाळीमुळे भयभयीत होऊन पळतांना दोन ग्रामस्थ पाय अडकुन पडले होते, यात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृत गोऱ्ह्याचा पंचनामा न करताच माघारी फिरावे लागल्याची नामुष्की संबंधितांवर ओढावली. पंचनाम्याचे रीतसर सोपस्कार नंतर पार केले जाणार असल्याचे समजते.