जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे. दरम्यान, पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले होते. या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागाीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाण यांच्या सुचनेनुसार पथकाने कारवाई केली.
यात संशयित आरोपी मोईद शेख अजीज (वय-२५) रा. खडका रोड, भुसावळ, शेख रेहान शेख रशिद वय २८ रा. आयान कॉलनी भुसावळ आणि सैय्यद अक्रम सैय्यद हातम वय २३ रा. माटरागाव ता.शेगाव जि.बुलढाणा यांना तिघांना अटक केली . त्यांच्याकडून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे.