⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगावात अवघ्या 10 सेकंदात लांबविली तीन लाखाची रोकड ; चोरटा CCTV कॅमेरेत कैद

चाळीसगावात अवघ्या 10 सेकंदात लांबविली तीन लाखाची रोकड ; चोरटा CCTV कॅमेरेत कैद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । एका प्रौढाने बँकेतून काढलेली ३ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी दुचाकीला अडकवली असता भामट्याने वृद्धाचे लक्ष नसतांना ही पिशवीच लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या भामट्याने केवळ १० सेकंदात ही पिशवी लंपास करून तेथून काही अंतरावर उभ्या असलेल्या आपल्या साथीदारासह दुचाकीवरून धूम ठोकली. सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झालेला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील वयोवृद्ध नामे राजेंद्र तान्हीराम वाणी ( वय – ५७) यांनी आपल्या दुचाकीच्या मागील बाजूला पिशवीत तीन लाख रुपये ठेवले होते. मात्र चोरट्यांनी ते पिशवीसह लंपास केल्याची धक्कादायक घटना आज शहरात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तत्पूर्वी सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झालेला आहे.

यामुळे सदर भामटा कुठे आढळून आल्यास त्वरित शहर पोलीस स्थानकाला संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. यासाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. संदीप पाटील – पोलीस निरीक्षक (मो.९८५००८७४५६), सुहास आव्हाड- पोउपनि – (मो.८८५०१२६७१८), योगेश माळी- पोउपनि (मो.७९७२००५६३९) व योगेश बेलदार पोहवा (मो.७०२०३१६३३५) आदी संपर्क क्रमांकांचा समाविष्ट आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.