---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा जामनेर भुसावळ

घरफोडी प्रकरणी तिघांना जामनेरहून अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | भुसावळ शहरातील तुकाराम नगरात झालेल्या घरफोडी प्रकरणी जामनेर येथील तीन संशयीतांना शहरातून अटक करण्यात आली आहे. शेख इरफान उर्फ हर्षद शेख रऊफ (24, टिपू सुलतान चौक, जामनेर), फातेर शेख उर्फ गोल्या तुफेल मोहम्मद शेख (18, ईस्लामपूरा, जामनेर) व शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर (21, मदिना नगर, जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

crime 2 jpg webp webp

घरफोडी प्रकरणी आरोपींना अटक
शहरातील तुकाराम नगरात 6 जानेवारी रोजी घरफोडी झाली होती. या घरफोडीत सुमारे 50 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुरनं.19/2023, भादंवि 454, 457, 380 अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीतील संशयीत जामनेरातील असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना पथकाने गोपनीय माहितीवरून शहरातून मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---