अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या तीन जणांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । पोलीसांच्या धडक कारवाईत आमोदा,डिस्कई,अमोदा येथे अवैध्य देशी विदेशी दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आले असता. त्याच्याकडील देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून, या प्रकरणी प्रोव्ही कायदा अन्वये तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई १४ रोजी झाली.
सविस्तर असे की,जळगाव तालुका पोलीसांच्या धडक कारवाईत दिलीप सुकलाल कोळी रा.आमोदा खु याच्या ताब्यात देशी विदेशीच्या १४ दारू बॉटल १ हजार १६० रुपये किमतीच्या मिळुन आल्या तर भास्कर चिंतामण पाटील रा.डिस्कई याच्या ताब्यात देशी विदेशी वेगवेगळ्या 55 दारू बॉटल ४ हजार ८६५ रुपये किमतीच्या मिळून आल्या.व मंगा झिपरू भिल रा.अमोदा याच्या ताब्यात गावठी हटभट्टीची दारू 50 लीटर ४ हजार ५०० रुपये किमतीचा मिळून आल्या असे एकूण १० हजार ५२५ रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून,या तिघांविरोधात प्रोव्ही कायदा अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,पीएसआय नयन पाटील, पोलीस हवालदार विश्वनाथ गायकवाड,नरेंद्र पाटील, प्रकाश चिंचोरे,दिपक कोळी,अशोक महाले,संजय भालेराव व अनिल तायडे यांनी केली.