⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

भावाला जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार ; जामनेरातील धक्कादायक प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२३ । जामनेर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार केला गेला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय तरुणीला तिच्याच गावात राहणाऱ्या मयूर देवेंद्र गोढरी याने १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर दरम्यान पीडित मुलीला “माझ्यासोबत पळून जाऊन लग्न कर, तू जर आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल” अशी धमकी देऊन तिच्याकडून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये नोटरीवर सही घेतली.

त्यानंतर तिची इच्छा नसताना तिच्यावर जबरी अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरुणीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मयूर देवेंद्र गोढरी यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.