जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । उन्हाळ्यात वाढत्या तापमाना मुळे शरीराचे तापमानही वाढते. तसेच शरीरातील पाणीही कमी होते.मनुष्याच्या शरीराच्या आकारमानानुसार ५५%-७०% पाणी असते.त्यामुळे शरीराती ल पाण्याची पातळी नियंत्रित राखणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात घामावाटे शरीराती ल पाणी कमी होत असते. त्यामुळे दिवसभरात ७-८ ग्लास पाणी पिण्याची आवश्यकता असते. इतक्या प्रमाणात पाणी प्यायले नाही तर शरीराला पाण्याची कमतरता भासते. शरीराकडून पाण्याची पातळी कमी झाल्याची काही लक्षणेही दर्शवली जातात.
शरीराचे निर्जलीकरणाची लक्षणे लघवीचे प्रमाण कमी होणे,गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे,तोंड कोरडे पडणे, डोकेदुखी,अस्वस्थता,चक्कर येणे,त्वचा कोरडी पडणे, उलट्या,जुलाब होणे.
पाण्याची कमतरता टाळण्यासाठी भरपूर पाणी
शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्या.१०- १२ ग्लास पाणी प्या.तहान लागत नसेल तर थोडे थोडे पाणी पित रहावे.
सरबत अशक्तपणा आला असेल तर लिंबू सरबत,कोकम सरबत,साखर मीठ पाणी/ इलेक्ट्रॉल पावडरचे सरबत प्या. शहाळ्याचे पाणी देखील पिता येते.
ताक जेवणात मधुर ताकाचे सेवन करा. त्यामुळे उर्जा मिळते
पाणीदार फळे मोसमी फळे जसे संत्री,मोसंबी,कलिंगड,खर बूज,स्ट्रॉबेरी ह्या सर्व फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. त्यांचे सेवन अवश्य करावे.
भाज्या, कडधान्य सलाडचे सेवन अधिक प्रमाणात करा कारण त्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते.त्याशिवाय लोह, प्रथिने,ओमेगा थ्री,तंतुमय पदार्थ,अँटीऑक्सिडंट हे घटक भरपूर प्रमाणात असतात.बीट, काकडी,टोमॅटो,कोबी तसेच मोडाची धान्ये आहारात असावी.
फळाचे रस ताजे फळांचा रस प्या तसेच उसाचा रसही प्यायला जाऊ शकतो.शरीराती ल पाणी कमी होऊ नये म्हणून उसाच्या रसात पुदीना घालून पिता येऊ शकते.*्
दही उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यास दही हा उत्तम पर्याय आहे.यात पाण्याचे ८५% प्रमाण असते.तसेच त्यात पचनासाठी आवश्यक जीवाणू असतात.म्हणजे प्रोबायोटिकचे भरपूर प्रमाण असते.दह्यामुळे आरोग्याचे अनेक फायदे आहेत त्यामुळे उन्हाळ्यात थंडावा देण्याबरोबर पाण्याचे प्रमाण वाढवते शिवाय प्रथिने,बी जीवनसत्व व कॅल्शिअम ही मिळते.दह्याचे ताक,लस्सी असेही प्रकार तयार करता येतात.
ब्रोकोली ब्रोकोलीत ८०% पाणी व पोषकही असते.तसेच नैसर्गिक अॕटीइन्फ्लमेटरी गुण असतात.त्यामुळे उन्हाळ्यात होणाऱ्या अॕलर्जीपासून बचाव करते.याचा वापर सलाडमध्ये कच्चाही करता येतो.तसेच भाजी करूनही खाता येतो.
सलाड ची पाने सलाडच्या पानात ९५% पाणीच असते. याचा वापर सँडविचमध्ये करता येतो.प्रथिने व ओमेगा-३ यांचे प्रमाण भरपूर असते.तसेच चरबी नसल्याने कॅलरीही खूप कमी प्रमाणात असते.
भात भातात ७०% पाणी असते.त्यामुळे शिजवलेला तांदुळ उन्हाळ्यात नक्कीच उत्तम आहार आहे.त्यात पुरेश्या प्रमाणात लोह,कार्बोहायड्रेट इ. असतात.तसेच उन्हाळ्याच्या काळात भात खाल्ल्यास चवही लागते.
आंब्याचे पन्हे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्या साठी आंब्याचे पन्हे देखील राम बाण उपाय आहे.दिवसभरात २ भांडी आंब्याचे पन्हे प्यायल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो. आंब्यात झिंक व सी जीवन सत्वाचे भरपूर प्रमाण असते.
काय टाळावे ? पेय पदार्था चे प्रमाण वाढवायचे असले तरी ही त्यात सॉफ्ट ड्रिंक पिऊ नये. तसेच डबाबंद ज्यूस पिऊन पाण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करु नये.तसेच अति प्रमाणात चहा कॉफी पिणे टाळा.कारण त्यात कॅफिन नावाचा घटक असतो ज्यामुळे तहान लागत नाही.
अति तहान लागण्याची वाट पाहू नये.नियमित अंतराने पातळ पेये घ्यावीत.जेवणा पुर्वी अर्धा तास पाणी प्यावे. जेणेकरून पचनसंस्था अन्नाचे पचन करण्यासाठी तयार होते.तसेच जेवणानंतर कमीत कमी २ तासांनी पाणी प्यावे.
रात्री झोपून उठल्यावर सकाळी २ ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकायला मदत होते.
व्यायामास सुरुवात करण्यापुर्वीही पाणी प्यावे.
लक्षात ठेवा उन्हाळ्यात काळजी घेऊन ही काहीवेळा त्रास होतो,तेव्हा १ दिवसा पेक्षा जास्त वेळा उलटी व जुलाब होत असतील तर रुग्णाला ताबडतोब डॉक्टर कडे न्यावे. शरीरातील पाणी कमी होण्यास काहीवेळा डायरिया कारणीभूत असतो. त्यावेळचा अशक्तपणा कमी करण्यासाठी साखरमीठ पाणी द्यावे.
नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
SANTOSH N. DHAGE
M.D.Panchgavya.
Therapy,
Yoga Naturopathy
(नाभीचिकित्सक ,नाडीपरिक्षा, योगोपचार,ऍक्युप्रेशर,निसर्गोपचार तज्ञ,संमोहन.