प्रवाशांनो लक्ष द्या ; मुंबई-बनारस दरम्यान ही विशेष रेल्वे गाडी भुसावळमार्गे धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष उन्हाळी गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातच रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस दरम्यान ६ फेऱ्या साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.

ट्रेनचे थांबे – ही ट्रेन दोन्ही दिशांना कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज जंक्शन स्थानकावर थांबेल.

ट्रेन क्र. ०१०५३ लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस एक्सप्रेस साप्ताहिक विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून दर सोमवारी ०१, ०८, १५, २२, २९ मे आणि ०५ जून २०२३ रोजी दुपारी १२:१५ वाजता सुटेल. त्यांनतर ती नाशिक रोड येथे दुपारी १५.१२ वाजेल पोहोचेल, भुसावळ येथे सायंकाळी १९.१० वा. पोहोचेल. इटारसीला दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री १२ वाजून २० वाजता, पिपरिया ०१.४० वाजता, जबलपूर ०४. ३० वाजता, कटनी ०७.०० वाजता, मैहर ०७.४२ वाजता, सतना ०८.२५ वाजता आणि मंगळवारी १६.०५ वाजता बनारस स्टेशनला पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०१०५४ बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस साप्ताहिक विशेष गाडी बनारस स्थानकावरून दर मंगळवारी ०२, ०९, १६, २३, ३० मे आणि ०६ जून २०२३ रोजी रात्री २०:३० वाजता सुटेल. बुधवारी ०३.३० वाजता मैहर,०.४.२५ वाजता कटनी, सकाळी ०६.०० वाजता जबलपूर, ०८.१८ वाजता पिपरिया, १०.१० वाजता इटारसी, दुपारी १२.५० वाजता खांडवा, भुसावळला १४.४० वाजता, नाशिक येथे १८.३७ला, इगतपुरी २०.४५, कल्याण २२.४० आणि २३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

कोच रचना- या ट्रेनमध्ये 06 एसी थर्ड क्लास, 08 स्लीपर क्लास, 06 जनरल क्लास, 01 जनरेटर कार, 01 SLRD यासह 22 L.H.B. प्रशिक्षक असतील.