⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

येत्या काही दिवसात लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२३ । मोबाईल फोन ही अत्यंत गरजेची गोष्ट झाली आहे. त्यामुळेच यात सातत्याने बदल करत युझर फ्रेंडली फोन आणण्याकडे कंपन्यांचा कल असतो. या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतात अनेक उत्कृष्ट स्मार्टफोन लॉन्च करत आहे. जानेवारी, फेब्रुवारीनंतर मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यातही अनेक स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत.

आताही येत्या दोन आठवड्यांत भारतातही अनेक स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. सॅमसंग आपले दोन नवीन फोन भारतात लॉन्च करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन याच आठवड्यात लाँच होणार आहेत. त्याच वेळी रिअलमी सी५५, iQOO Z7 5G आणि Infinix Hot 30i देखील या महिन्यात भारतात लॉन्च होतील. तुम्हीही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा.

सॅमसंग गॅलॅक्सी A34 5G आणि Galaxy A54 5G
सॅमसंग गॅलॅक्सी A34 आणि A54 हे दोन्ही फोन भारतात लॉन्च झाले आहेत. सॅमसंगच्या A54 फोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर आणि 8 GB रॅम अशी वैशिष्ट्ये असतील. फोनमध्ये २५६ GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. याशिवाय, फोनमध्ये Android 13 आधारित One UI 5.0 असेल. तसेच ट्रिपल रिअर कॅमेरा मिळू शकतो. तर Galaxy A34 5G मध्ये एमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो. दोन्ही फोनमध्ये मोठी बॅटरी सपोर्ट असेल.

Realme C55
हा फोन भारतात २१ मार्च रोजी येणार आहे. जागतिक बाजारपेठेत नुकताच हा फोन सादर करण्यात आला आहे. Realme C55 सह मिनी आयलँड कॅप्सूल देखील उपलब्ध असेल. Realme C55 चे मिनी आयलँड कॅप्सूल Apple च्या iPhone 14 सीरीजच्या डायनॅमिक आयलँडसारखे असल्याची चर्चा आहे. जागतिक बाजारपेठेत, फोनला 90Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंचाच्या फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. फोनमध्ये पाच हजार mAh बॅटरी आणि फास्ट चार्जर मिळणार आहे. भारतातही याच वैशिष्ट्यांसह हा फोन लॉन्च होऊ शकतो.

iQOO Z7 5G
iQOO Z7 5G हा फोनही भारतात २१ मार्चलाच लॉन्च होईल. iQOO Z7 5G लाँचचे पोस्टर देखील समोर आले आहे. नवीन फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या iQOO Z6 मालिकेची सुधारित आवृत्ती असेल. Snapdragon 778G Plus किंवा MediaTek Dimensity 920 हे प्रोसेसर या फोनमध्ये असू शकतात. फोनमध्ये 6.4-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आणि 64-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

Infinix Hot 30i
Infinix चा नवीन बजेट फोन २७ मार्च रोजी भारतात लॉन्च होणार आहे. हा फोन ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि डायमंड व्हाइट, ग्लेशियर ब्लू आणि मिरर ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. Infinix Hot 30i सह, 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 16GB पर्यंत RAM असेल. Infinix Hot 30i ला 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा IPS डिस्प्ले आणि सुरक्षिततेसाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल.