⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | जिल्ह्यात बांधण्यात येणारा “हा” पुल ठरणार हजारो नागरिकांसाठी वरदान

जिल्ह्यात बांधण्यात येणारा “हा” पुल ठरणार हजारो नागरिकांसाठी वरदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२३ । एखाद्या नागरिकाला खेडी भोकर ते चोपडा जायचे असेल तर 70 किलोमीटरचे अंतर पार करून जावे लागत आहे. तर दुसरीकडे अदावद मार्गे जायचे असेल तर तब्बल 21 किलोमीटरचा फेरा वाढत आहे. शिवाय परिसरातील खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोगावले, गाढोदे, करंज, सावखेडा गावातील शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे रोजच्या रोज हा अधिकचा फेरा मारावा लागत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

मात्र आता भोकर नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे जळगाव आणि चोपडा या दोन तालुक्यातील नागरिकांचा फेरा वाचणार असून केवळ 15 किलोमीटरच्या अंतर त्यांना पार करावा लागणार आहे. (bhokar pool chopda)

हा पूल बांधण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे व आमदार लता सोनवणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच आज नागरिकांना हा पूल पाहता येणार आहे. याचबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही निधी मिळवून देण्यामध्ये मदत केली आहे. यामुळे हजारो नागरिकांचा प्रवास सुखद होणार आहे.

भोकर नदीवर बनण्यात येणारा हा पूल नागरिकांसाठी संजीवनीच असणार आहे. हा पूल बांधण्यासाठी तब्बल दीडशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळाला असून हजारो नागरिकांचा व शेतकऱ्यांचा यामुळे मोठा फेरा वाचणार आहे.

हा पूल तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाईल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे. स्टील रेलिंग रोडसाइड फर्निचर व इतर अनुषंगिक बाबींचा यात समावेश आहे. यासाठी राज्य शासनाने तब्बल १५० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. (how bridege is made? )

दरम्यान पुलाचे १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खणीकर्म विभागाचे मंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार, आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. (eknath shinde in chopda)

author avatar
टीम जळगाव लाईव्ह