---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

तुमच्या जवळचे लोकं तुम्हाला सोडून का जातात याचा विचार करा – मंत्री छगन भुजबळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । तुमच्या जवळचे लोकं तुम्हाला सोडून का जातात याचा विचार करा, राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिलाच कशाला, मी भविष्याच खूप मोठे गौप्यस्फोट करणार आहे असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दीला आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवारांनी कालच्या सभेत सांगितलं की पवारांनी मला येवला मतदारसंघ दिला पण तसं नाही येवला मतदारसंघ मी साहेबांना मागून घेतला” हे खरे आहे., मी भविष्याच खूप मोठे गौप्यस्फोट करणार आहे

chagan bhujbal sharad pawar jpg webp webp

मी ओबीसी आहे म्हणून तुम्ही येथे सभा घेतली का? असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी विचारला आहे. तुम्ही पहिली सभा तुमच्या बारामतीत का घेतली नाही? पहिली सभा दिलीप वळसे यांच्या मतदारसंघात ठरली असताना ती येवल्यात घेतली. मी ओबीसी आहे म्हणून तुम्ही येथे सभा घेतली का? असेही ते म्हणाले.

---Advertisement---

पवारांनी विचार केला पाहीजे.
भुजबळ पुढे म्हणाले की, “हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? आता ६१-६२ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं ते अजित पवार तर मुख्य आहेत. ते तर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, ते बघा ना का आहेत ते. ही इतकी मंडळी का गेली याचा विचार करा. दिलीप वळसे, दिल्लात अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत मंत्री, खासदार असलेले प्रफुल्ल पटेल का जातात? याआधी सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब प्रफुल्ल पटेलांनांच पाठवत होते. ते का सोडून गेले याचा विचार करायला पाहिजे.” शरद पवारांना वाटतं की, छगन भुजबळांनी हे घडवून आणलं ही चुकीची कल्पना आहे, असेही भुजबळ म्हणाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---