जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२५ । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दुचाकी चोरी, घरफोडीसारख्या घटना सातत्यातने समोर येत आहे. यातच आता ईच्छादेवी चौफुलीजवळील एका वाईन शॉपमधील ७० हजार रुपयाच्या रोकडसह लाखो रुपये किमतीची दारू चोरून नेल्याची घटना आज सकाळी २३ रोजी उघडकीस आला. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले असून डिव्हिआर देखील चोरून केला आहे.

याबाबत असे की, भुसावळ येथील रहिवासी असलेले अशोकशेठ नागराणी यांचे जळगावात ईच्छादेवी चौफुलीजवळ महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी नावाने मद्य विक्री दुकान आहे. मंगळवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधत दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला.
दरम्यान, चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख रक्कम आणि जवळपास १२६ बॉक्स देशी विदेशी दारू लंपास केली आहे. दारूची एकूण रक्कम अंदाजे १० लाख रुपये आहे. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले असून डिव्हिआर देखील चोरून केला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जिल्हापेठ पोलीस आणि एलसीबी यांच्या पथ्काने यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीमने ठसे व अन्य पुरावे गोळा केले असून, अधिक तपास सुरू आहे.