जळगावकरांनो काळजी घ्या ! आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’

एप्रिल 23, 2025 2:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२५ । सध्या जळगावमध्ये अक्षरशः भाजून काढणारे ऊन पडत आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे जळगावकर होरपळून निघत आहे. यातच हवामान विभागाने आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

tapman 2

गुरुवारी, शुक्रवारी जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान, मंगळवारी जळगाव शहराचा पारा ४२.८ अंशांवर पोहोचल्याची नोंद ममुराबाद वेधशाळेत करण्यात आली होती. ममुराबाद वेधशाळेकडे ४२.८ अंशाची नोंद झाली असली तरी इतर हवामान नोंद करणाऱ्या संस्थांकडे जळगाव शहरात मंगळवारी ४५ अंशांची नोंद करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात उष्णतेमुळे सुरू असलेली काहिली कायम आहे.सकाळ ८ वाजेपासूनच उन्हाचा चटका बसत आहे. तर दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे मुश्किल होत असून रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाच्या चटक्याने होरपळ वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. यातच आगामी दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, तापमान वाढीसह वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाडा चांगलाच जाणवणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment