⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | पारोळा तालुक्यात एकाच रात्री चार ठिकाणी चोरट्यांचा डल्ला

पारोळा तालुक्यात एकाच रात्री चार ठिकाणी चोरट्यांचा डल्ला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथे ६ रोजी मध्यरात्री चार ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना घडल्या. यात २ घरे एक वेल्डिंग दुकान व नवनाथ मंदिराची दानपेटी फोडून, एकूण २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत आनंदराव निकम, दिनेश पाटील यांनी पारोळा पोलिसांना माहिती दिली. आनंदराव निकम हे ४ रोजी घराला कुलूप लावून मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमासाठी बांभोरी (ता.धरणगाव) येथे गेले होते. त्यांना ७ रोजी सकाळी शेजारील रहिवासी राजू निकम यांनी घरात चोरी झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासह उषाबाई बाळू पाटील यांचे घर व योगेश विठ्ठल खैरनार यांचे वेल्डिंग दुकान फोडून रोख रक्कम व चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल चोरी झाल्याचे समोर आले. तसेच गावातील श्री चैतन्य नवनाथ सिद्धाश्रम मंदिरातही चोरट्यांनी चोरी केली.

मंदिरातील सीसीटीव्ही चे डीव्हीआर चोरून नेत चोरांनी मंदिराची दानपेटी फोडली. त्यातील १५ हजार रुपयांची रोकड चोरांनी लंपास केली. एकाच रात्री गावात चार ठिकाणी चोऱ्या झाल्यामुळे भीती निर्माण झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव तपास करत आहेत.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह