जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एकाच दिवशी चार ठिकाणी जबरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
अमोल ताराचंद पाटील (वय २३, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) हे दि.५ रोजी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास जारगाव चौफुली येथे जात असताना एका अनोळखी इसमाने थांबवून मला तारखेळा रस्त्यावर सोड, असे बोलून तारखेळा रस्त्यावरील अन्नपूर्णा हॉटेलच्या पुढे फिर्यादी यास डाव्या बाजूने घेऊन गेले व त्यांच्या मित्रांना बोलवून फिर्यादीच्या खिश्यातुन ५५० रुपये बळजबरीने काढून घेतले व अजून पैसे दे नाहीतर तर तुला मारून टाकू असे धमकावले. या प्रकरणी पाटील यांनी दि. ६ रोजी पाचोरा पोलिसांत तक्रार दिली. तपास उपनि. योगेश गणगे करीत आहे.
राकेश तनाकु पाटील ( चोपडा ग्रामीण पोलीस ) यांना दि.६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरोपी सागर रवींद्र धनगर (वय २२) हा बुधवार ते गलवाले रोडवर मोबाईल टॉवर जवळ आर्थिक हितासाठी विनापरवाना अवैध्य तापी नदीच्या पात्रातून रेतीचे उत्तखनन करून ट्रक (क्र.एमएच १९ एएम १३१८) ला जोडलेली निळ्या रंगाची ट्रॉली त्यात साधारण ५००० हजार रुपये किमतीचा वाळू चोरी करून अवैध्य रित्या विना परवाना वाळू चोरी करताना मिळून आला. या प्रकणारी पाटील यांनी दि. ६ रोजी दुपारी १.३० वाजता चोपडा पोलिसात फिर्यादी दिली. तपास पोना. शशिकांत पारधी करीत आहे.
शुभांगी विश्वात सावंत (वय २१, रा. चमगाव ता. धरणगाव, ह.मु कमल नगर धरणगाव ) ही तरुणी दि.५ रोजी दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास घरी एकटी असताना अनोळखी दोन इसम तोंडाला रुमाल बांधून चोरीच्या उद्देशाने घरात घुसून आले. व फिर्यादीच्या डोक्यात झाडूने मारून, त्यांच्या हातातील रुमाल नाका-तोंडावर लावून एक फळक्याचा बोळा फिर्यादीचे तोंडात खपसवून, हात बांधले व घरातील कपाट मध्ये शोधा शोध सुरु केली. मात्र काही न मिळून आल्याने, फिर्यादीस पैसे कुठे ठेवले आहे. म्हणत धमकी दिली. दरम्यान घरा जवळील रस्ता असल्याने वाहनाचा आवाज आल्याने गाभरून चोरट्यांनी पड काढला. या प्रकरणी सदर तरुणीने दि. ६ रोजी दुपारी ४.३० वाजता धरणगाव पोलिसांत फिर्यादी दिली. तपास पोना. उमेश पाटील करीत आहे.
इश्चराम हिम्मत पाटील (वय ७०, रा. बेंडाळे नगर जळगाव) दि. ६ रोजी रात्री ००.१५ ते ४.०० वाजे दरम्यान यांच्या राहत्या घराच्या बेडरूममध्ये खीळकिची प्लॅस्टिकची जाळी काढून कश्याच्या तरी साहाय्याने दरवाजाला टांगलेली पँट खिळकीतून बाहेर काढून पॅन्ट मधील ११ हजार ५०० रुपये लांबवीले. या प्रकरणी पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसांत फिर्यादी दिली. तपास पोना संतोष सोनवणे करीत आहे.