---Advertisement---
गुन्हे पारोळा

चोर-पोलिसांच्या पाठलागचा थरार, तिघे पसार, चोरट्यांची विना क्रमांकाची दुचाकी जप्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून, २० हजार रुपये लंपास केल्याची घटना, मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास पारोळा येथील पालिका चौकातील घडली. या घटनेतील तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान, चोरटे दुकानात असतानाच गस्तीवरील पोलिसांचे वाहन आल्यानंतर चोरटे विनाक्रमांकाच्या दुचाकीवर पसार झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. त्यामुळे चोरटे दुचाकी सोडून अंधारात पसार झाले.

crime 88

गुन्हा दाखल याप्रकरणी पारोळा पोलिसात राम हिंदुजा यांनी फिर्याद दिली. २३ रोजी रात्री नऊ ते २४ रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान शहरातील नगरपालिका चौकातील, सिताराम डिलाराम किराणा मर्चंट हे दुकान‌ चोरट्यांनी फोडले. किराणा दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा तोडून चोरांनी वीस हजार रुपये दुकानातील गल्ल्यातून चोरून नेले. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---