⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळात दीड लाखांची चोरी : चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळात दीड लाखांची चोरी : चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ ।  दुकानाचे शटर वाकवून दुकानाच्या ड्रावरमधील सुमारे दिड लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात 14 रोजी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे. कृष्णा पन्नालाल धोबी (26, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ)  असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

जळगाव रोड जुना सातारा मरीमाता मंदिराजवळील राहत्या घराच्या खालच्या मजल्यावर असलेल्या ज्ञानदीप सुपर शॉपीचे अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून काउंटरमधील दीड लाखांची रोकड चोरट्याने लांबवली होती. ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री घडली होती. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरट्याची छबी कैद झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनवणे, सचिन चाटे, इसराइल खाटीक यांनी आरोपीला अटक केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.