---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा बातम्या

वृद्धेची चेन लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव एमआयडीसीतील एका लॉन्समधील लग्न समारंभाला उपस्थित ८५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील २१ ग्रॅम सोनपोत लंपास करणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी १४ दिवसांनी पकडले आहे.अनिल विजय हरताडे (रा. लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल) असं ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.

kulbhushanpatil firing case arrest

६ मे रोजी लग्नसोहळ्यात पुष्पा जगन्नाथ न्याती (वय ८५) उपस्थित होते, रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या रुममध्ये एक अनोळखी व्यक्तीने प्रवेश केला आणि त्यांच्या गळ्याला काहीतरी लागल्याचे सांगून गळ्यातील २१ ग्रॅम वजनाची सोनपोत लंपास केली. याबाबत त्यांचा मुलगा हेमंत न्याती यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान, संशयित अनिल विजय हरताडे (रा. लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल) याने ही चोरी केली असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.

---Advertisement---

त्यावरुन बुधवारी ताब्यात घेतले असता चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याला एमआयडीसी पोलिसांच्या हवाली करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख, बाबासाहेब पाटील यांनी केली. तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment