⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | वाणिज्य | 1 जूनपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ; तुमच्या माहितीसाठी आत्ताच जाणून घ्या..

1 जूनपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ; तुमच्या माहितीसाठी आत्ताच जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२४ । मे महिना संपायला आणि जून महिना सुरु व्हायला आता केवळ चार दिवस शिल्लक आहेत. . अशातच असे अनेक बदल आहेत जे 1 जून रोजी होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणारे आहेत. हे नियम आत्ताच जाणून घ्या, अन्यथा तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.

1 जूनपासून ‘या’ नियमांमध्ये बदल होणार
SBI रिवॉर्ड पॉइंट

SBI ही सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक 1 जूनपासून रिवॉर्डशी संबंधित अनेक बदल करणार आहे. म्हणजे असे अनेक व्यवहार ओळखले गेले आहेत. ज्यावर ग्राहकांना बक्षिसे दिली जाणार नाहीत. यामध्ये स्टेट बँकेचे AURUM, SBI कार्ड ELITE, SBI Card ELITE Advantage आणि ABI Card Pulse, SBI Card Pulse, SimplyCLICK SBI Card, SimplyClick Advantage SBI कार्ड यांचा समावेश आहे.

गॅस सिलिंडरच्या दरात बदल
प्रत्येक महिन्याच्या (Rules change in June) पहिल्या दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिडंरच्या दरात बदल होत असतात. याआधी 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी झाले होते. व्यावसायिक गॅसदेखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता. आता जूनमध्ये याच्या किमती वाढणार की घटणार ते पाहावं लागेल.

आधार कार्ड बदल
14 जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येतील. आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील.

वाहतुकीचे नियम
अल्पवयीन मुले गाडी चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे. हा दंड 25 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच 25 वर्षांपर्यंत (Rules change in June) लायन्सन्स देण्यात येणार नाहीये.

यासोबतच वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चावल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. यापूर्वी यासाठी 1000 रुपये आकारले जात होते. तसंच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

CNG-PNG दर अपडेट
तुम्हाला सांगतो की निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून रोजी संपत आहे. अशा स्थितीत सीएनजी-पीएनजीच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. नुकतेच महाराष्ट्रात सीएनजीचे दर कमी करण्यात आले आहेत. मात्र, त्यात घट होईल की वाढ होईल, याचा अंदाजच बांधता येतो. सीएनजी आणि पीएनजीच्या किमती किती वाढणार हे 1 जूनलाच कळेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.