जळगाव लाईव्ह न्युज । ९ ऑगस्ट २०२२ । अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला असून यावेळी 18 आमदारांनी मंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यात शिंदे गटाच्या 9 आणि भाजपाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, आज शपथ घेतलेले सर्वच मंत्री हे कोट्यधीश आहेत.यातील सर्वाधिक जास्त संपत्ती ही मलबार हिलचे भाजपाचे आमदार आणि नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या नावावर आहेत. संदीपान भुमरे हे या मंत्रिमंडळआतील सर्वात गरीब मंत्री आहेत.
सर्वाधिक जास्त संपत्ती असलेले भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहे. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 441 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. ६ वेळा आमदारकी भूषवलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 252 कोटी रुपयांची चल तर 189 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडे 14 लाख रुपयांचा जग्वार कार असून शेअर बाजार आणि बॉण्डमध्ये त्यांनी गपंतवणूक केलेली आहे. दक्षिण मुंबईत लोढा यांचे पाच फ्लॅट आहेत. लोढा यांच्याविरोधातही पाच गुन्हे दाखल आहेत.
सर्वाधिक कमी संपत्ती असलेले :
तर 2 कोटी संपत्ती असलेले संदीपान भुमरे हे या मंत्रिमंडळआतील सर्वात गरीब मंत्री आहेत. संदीपान भुमरे हे पैठणचे आमदार असून, गेल्या 35 वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. शिंदेंच्या बंडावेळी संदीपान भुमरे यांनी त्यांची साथ दिली आहे.
115 कोटींच्या संपत्तीसह तानाजी सावंत दुसऱ्या स्थानी
उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विजयी झालेले तानाजी सावंत हे संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे 115 कोटींची संपत्ती आहे. तानाजी सावंत हे शिंदे गटातील आमदार आहेत. तर तिसऱ्या स्थानी सावंतवाडीचे आमदार आणि संपूर्ण बंडाच्या काळात शिंदे गटाचे प्रवक्तेपद सांभाळणारे दीपक केसरकर आहेत. त्यांच्याकडे 82 कोटींची संपत्ती आहे. निवडणूक आयोगाकडे या सगळ्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या संपत्तीचा उल्लेख आहे.
इतर मंत्र्यांची संपत्ती
विजय गावित, भाजपा – 27 कोटी
गिरीश महाजन, भाजपा – 25 कोटी
राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा – 24 कोटी
अतुल सावे, भाजपा – 22 कोटी
अब्दुल सत्तार, शिंदे गट – 20कोटी
शंभूराजे देसाई – शिंदे गट -14 कोटी
सुधीर मुनगंटीवार, भाजपा – 11.4 कोटी
दादा भुसे – 10 कोटी