---Advertisement---
महाराष्ट्र बातम्या

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे ६ महत्वाचे निर्णय

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१३ मे) मंत्रिमंडळ बैठक पार पडली. याबैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महिला व बालविकास विभाग, महसूल विभाग, वित्त विभाग आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागासाठी ६ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जाणून घ्या नेमके कोणते निर्णय घेतले.

mantralay fadanvis

आजचे मंत्रिमंडळ निर्णय –
१) मोबाईल व्हॅन –
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली आहे. २९ महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात ३१ मोबाईल व्हॅन, यासाठी सुमारे ८ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. (महिला व बालविकास विभाग)

---Advertisement---

२) होम स्वीट होम –
नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पबाधितांना ‘होम स्वीट होम’ अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजास मुद्रांक शुल्क कमी करुन फक्त एक हजार रुपये आकारणार. (महसूल विभाग )

३) कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणास मंजुरी –
प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती/ संस्थांना एम-सँड युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगविभाग सवलती देणार, एम-सँड तयार करणार्‍या युनिटला २०० रुपये प्रतिब्रास इतकी सवलत देणार. पर्यावरणाची हानी टळणार. (महसूल विभाग)

४) वेतनत्रुटी निवारण समिती-
राज्य वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल स्वीकृत. ८० कोटींचा भार राज्य सरकार स्वीकारणार. (वित्त विभाग)

५) राज्यातील शासकीय आयटीआयचे सार्वजनिक-खासगी भागिदारीतून अद्ययावतीकरण धोरण –
आयटीआयला जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात रुपांतरित करणे हा मुख्य हेतू, उद्योग आणि आयटीआयच्या समन्वयातून रोजगारक्षमता वाढणार, प्रॅक्टिकल लर्निंग आणि अप्लाईड लर्निंगचे उद्देश साध्य होणार. (कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग)

६) नागपूरमधील विद्यापीठाला जागा –
राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातील उपकेंद्रासाठी चिंचोली (ता. कामठी) जिल्हा नागपूर येथील २०.३३ हेक्टर आर जागा देण्याचा निर्णय (महसूल विभाग)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment