जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । आजपासून मे सुरू झाला आहे. या वेळी आजपासून महिन्याच्या सुरुवातीला अनेक बदल झाले आहेत. १ मेपासून एलपीजी सिलिंडरपासून टोल आकारणीपर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत. यापैकी अनेकांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे?
सिलिंडरची दरवाढ
सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. सिलिंडर 102.50 रुपयांनी महागला आहे. नवी किंमत लागू झाल्यानंतर 1 मेपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2253 रुपयांवरून 2355.50 रुपयांवर पोहोचली आहे.
IPO मध्ये UPI पेमेंट मर्यादा वाढली
एप्रिलमध्ये, SEBI ने IPO साठी UPI द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला होता. हा नियम १ मे पासून लागू करण्यात आला आहे. आता तुम्ही UPI च्या मदतीने कोणत्याही IPO मध्ये 5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती.
सिलिंडरशिसह जेट इंधन महाग
एलपीजी सिलिंडरशिवाय जेट इंधनही १ मेपासून महाग झाले आहे. दिल्लीमध्ये एअर टर्बाइन इंधन (ATF) चा दर 116851.46 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे. यापूर्वी 16 एप्रिललाही एटीएफच्या किमतीत वाढ झाली होती.
पूर्वांचल एक्सप्रेस वे वर टोल टॅक्स
पूर्वांचल द्रुतगती मार्गावर १ मेपासून टोल टॅक्स सुरू होत आहे. या एक्स्प्रेस वेवर काही टोल टॅक्स 833 रुपये असेल. मात्र 25 टक्के सवलतीनंतर तुम्हाला 625 रुपये टोल भरावा लागेल. यूपी निवडणुकीमुळे हा एक्स्प्रेस वे आतापर्यंत टोलमुक्त ठेवण्यात आला होता.
13 दिवस बँका बंद राहतील
मे महिन्यात शनिवार आणि रविवार सुट्ट्यांसह सुमारे 13 दिवस बँक सुट्ट्या असतील. या वेळी शनिवार आणि रविवारी 7 सुट्ट्या आहेत. याशिवाय 2 मे रोजी महर्षि परशुराम जयंती, 3 मे रोजी ईद-उल-फित्रची सुट्टी आहे. काही राज्यांमध्ये 4 तारखेलाही ईदची सुट्टी असते. 9 मे रोजी गुरु रवींद्रनाथ जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये सुट्टी असेल. 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे आणि काझी नजरुल इस्माल यांचा वाढदिवस 24 मे रोजी आहे.