⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आमदारांमध्ये भांडण झाले नाही, ‘या’ आमदाराने केला खुलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ ।  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ५० आमदार गेल्या पाच दिवसापासून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये जाऊन थांबले आहेत. पाच दिवस झाले तरी कोणताही तोडगा निघत नसून शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. नवीन सरकार स्थापनेचा कोणताही मुहूर्त निघत नसल्याने बंडखोरांमध्येच वादविवाद सुरु झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील देखील दोन आमदारांमध्ये शनिवारी वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची चर्चा सकाळी रंगू लागल्या होत्या. याबाद उत्तर आले असून असे काहीही झाले नसल्याने समजते आहे.

अधिक माहिती अशी कि, आमदार प्रकाश आबिटकरांनी याबाबत खुलासा केला असून कुणीतरी खोडसाळपणे हे वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “मी एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गुवाहाटीत असलेल्या आमदारांमध्ये मारहाण झाल्याची बातमी पाहिली होती. या बातमीत माझ्याही नावाचा उल्लेख होता. अशा पद्धतीची कोणतीही घटना या हॉटेलमध्ये घ़डलेली नाही. या सर्व गोष्टी संपूर्णत: अफवा आहेत. अशा अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका” असं प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे.

https://fb.watch/dU8cl51FJl/

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यावर हे सर्व शांत झाले असले तरी भविष्यात मंत्रिपद कुणाला मिळणार यावरून वाद झाल्याचे समजते.शिंदे गटाच्या बंडखोरीने शिवसेना हादरली असून बंड केलेल्या आमदारांवर कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जात. मात्र आता शिवसेनेत अंतर्गत वाद व्ह्यायला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील २ आमदारांमध्ये चागलीच भांडण झाली असे म्हटले जात आहेत. हे भांडण मंत्रिपदामुळे असून अजून कोणतीही कारण याला नाही असे म्हटले जात आहे.