जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले

एप्रिल 29, 2025 3:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडीच्या घटना सातत्याने वाढतच असल्याचं दिसून येत आहे. अशातच जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी ५३ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रविवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gharphodi chori jpg webp

याबाबत असे की, गोपालसिंह भिंमसिंह राजपूत (वय ६८, रा.यश लॉन परिसर,जळगाव) असे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. गोपालसिंह राजपूत हे भोईटनगर भागातील यश लॉन परिसरात आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहेत. ते १० एप्रिल पासून सोलापूर येथे आपल्या मुलीकडे उन्हाळी सुट्ट्यानिमित्त गेले होते. २५ एप्रिल रोजी गोपालसिंह राजपूत यांच्या शेजाऱ्यांना त्यांचे घर उघडे दिसले, तरी कडीकोयंडा देखील फेकलेला दिसलेला.

यामुळे शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती गोपालसिंह राजपूत यांना दिली. त्यानंतर राजपूत यांनी जळगावात येऊन शहर पोलिसांना तक्रार दिली. दरम्यान, या घरफोडीत चोरट्यांनी ३ ग्रॅम सोन्याचे मणी, लहान बाळाची ४ ग्रॅमची सोन्याची चैन, ९ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा तुकडा, चांदीच्या वाट्या, रेमंड कंपनीचे कापड, गाऊन व ५ हजार रुपयांची रोख रक्कम अस ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment