गुन्हेभुसावळ

तो तरुण विहिरीत पडला नव्हता, मित्रानेच ढकलत केली होती हत्त्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील जाडगाव येथे ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दि. ८ रोजी घडली होती. या प्रकरणी पुढील तपास सुरु होता, अखेर दोघे मित्र दारू पिऊन विहीरीच्या काठावर बसून गप्पा मारताना त्यांच्यात शाब्दिक खटका उडाला आणि एकाने दुसऱ्याला चापटा बुक्के पाठीत मारून विहिरीत ढकलून दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून संशयितास अटक करण्यात आली आहे.

गोंविदा संतोष पाटील (वय ३५) असे मयत तरुणीचे नाव आहे. पाटील याचे तालुक्यातील जाडगाव येथे दि. ८ सोमवार रोजी गावातील पंचायती विहिरात पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सुरुवातीस पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पो. हे. कॉ. मधुकर भालशंकर व कॉ. योगेश पाटील हे तपास करीत असताना सदर माहीती समोर आली आहे.

गावातील गोंविदा संतोष पाटील (वय ३५) व राजु युवराज सोनवणे (वय ३२) हे दोघे मित्र कित्येक दिवसांपासून सोबत राहून काम करीत असायचे. दि. ८ सोमवार रोजी दुपारच्या वेळेस दोघांनी सोबत दारू पिऊन गावातील पंचायती विहिरीच्या काठावर बसून गप्पा मारत बसले. त्यात दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाले व गोविंदाला राजूने चपाटा बुक्याने मारून विहिरीत लोटून दिल्याने गोविंदाचा पाण्यात पडून अंत झाला होता. याबाबत सुरुवातीस वरणगाव पोलीस स्टेशला संतोष जगदेव पाटील यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलीसांना या घटनेची शंका असल्याने या घटनेचा बारकाईने तपास करून उलगडा सोडविला.

याबाबत मयताचे वडील संतोष पाटील यांच्या फिर्यादीनुसार राजु सोनवणे यास अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात भा. द. वी. कलम ३०४, ३२३ सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक आशिष आडसुड करीत आहेत.

Related Articles

Back to top button