जळगाव शहर

दिल्लीत जाऊन ‘लाल’ करून घेतलेल्या मनपाच्या भिंती झाल्या ‘लाल’ !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांच्या स्वच्छ अमृत महोत्सवतंर्गत जळगाव महापालिकेला थ्री स्टार नामांकन प्राप्त झाले होते. त्यानुसार दिल्लील विज्ञान भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात जळगाव महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला होता. मात्र आत्ता याच पालीकेच्या ३ स्टार भिंती लाल झाल्या आहेत. या भिंतींना कोणताही रंग देण्यात आला नसून केवळ नागरिकांनी थुंकण्यामुळे भिंत लाल झाली आहे. मात्र अजून याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेला मिळालेल्या 3स्टार चा गवगवा संपूर्ण शहरात करण्यात आला. मात्र आता याच महानगरपालिकेच्या आलिशान इमारतीमध्ये ठिकाणी पंचाने फवारे पहिला मिळत आहेत. एकीकडे स्वच्छ भारत अंतर्गत संपूर्ण जळगाव शहरात स्वच्छतेचे काम महानगरपालिकेतर्फे हातात घेण्यात येत आहे. याबाबत नागरिक समाधानी नाहीत ही जरी ही बाब गृहीत धरली तरी महानगरपालिकेला स्वच्छ भारत सर्वेक्षणात 3 स्टार मिळाले आहे ही बाब तितकीच खरी आहे. मात्र ज्या प्रकारे दिव्याखाली अंधार असतो त्याच प्रकारे महानगरपालिकेत सर्वत्र थुकलेले दिसत आहे. महानगरपालिकेच्या भिंती लाल झाल्या आहेत. अशा वेळी नागरिकांपुढे मोठा गवगवा करणारे महानगरपालिकेचे प्रशासन याकडे गांभीर्याने बघेल अशी अपेक्षा.

जळगाव शहर महानगर पालिकेला 3 स्टार मिळाला त्या वेळी संपूर्ण जळगावकर जनतेने महानगरपालिकेचे अभिनंदन केले होते. मात्र आता जळगावकर जनता महानगरपालिकेत काही ना काही कामानिमित्त जात असते. अशा वेळी इथे थांबलेले बघून नक्की ३ स्टार मिळाला आहे. की तो मिळवला आहे. असा प्रश्न जळगाव शहरातील नागरिक विचारत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गोष्टीकडे नगरसेवकांचे देखील दुर्लक्ष होत आहे.

Related Articles

Back to top button