चोपड्यातील अनेर नदी पुलावर खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक कलंडला

नोव्हेंबर 7, 2025 1:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शिरपूर रस्त्यावरील अनेर नदीच्या पुलावर खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक अचानक उलटला. ट्रक भर रस्त्यात आडवा झाल्याने या मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक सात तास ठप्प झाल्यामुळे वाहनधारकांचे हाल झाले.

anerrivertruck

चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अनेर नदीच्या पूलावर सकाळी प्रचंड धुक्यामुळे आणि पुलावर असलेल्या खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक अचानक पुलावरच पलटी झाला. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. याचा फटका अनेक प्रवाशांना आणि चोपडा आगाराच्या एसटी बसेसला देखील बसला.

Advertisements

वाहतूक बंद झाल्याने २० ते २५ किमीच्या अंतर फेऱ्याने घोडगाव व मोहिदा मार्गे बसेस फिरावाव्या लागल्याची माहिती आगारप्रमुख यांनी दिली. या अपघातात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी पुलाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चोपडा आणि शिरपूर रस्त्यावर असलेला हा अनेर नदीवरचा पुल हा थाळनेर ता. शिरपूर तालुक्याच्या हद्दीत असल्याने ट्रक कुठला आणि चालक कोण हे उशिरापर्यंत कळू शकले नाही. दुपारी १ वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याचे समजते.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now