जळगाव लाईव्ह न्युज । १३ एप्रिल २०२२ । येथील महाबळ परिसरातील रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाने ने समोरील ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना दिनांक १३ रोजी दुपारच्या सुमारास घडली.
अधिक असे की, महाबळ परिसरात ट्रक क्रमांक एम.एच. १८ ए.ए .99 21 हा संभाजीनगर कडे जात असताना समोरील ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १९ बी.जि 0103 याला धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन ट्रॅक्टर मधील सिमेंटच्या गोण्या रस्त्यावर पडल्या तसेच ट्रॅक्टर वरील एक जण जखमी झाला. या अपघातामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.