⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | धावत्या बसचे टायर अचानक निघाले अन्.. चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

धावत्या बसचे टायर अचानक निघाले अन्.. चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३ । राज्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून एसटी महामंडळाच्या बसला ओळखले जाते. मात्र अनेक एसटी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आणि धोकेदायक झाली आहे. यामुळे अनेकवेळा प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. दरम्यान, मुक्ताईनगर ते संभाजी नगर जाणाऱ्या चालत्या बसचे टायर निघाल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नसून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सोमवारी मुक्ताईनगर येथून छत्रपती संभाजी नगर जाण्यासाठी निघालेली ही बस कुऱ्हा गावाजवळून रस्त्याने जात असताना अचानक एसटी बस टायरचे बेरिंग फुटल्याने चालू बसचे पुढचे चाक निघून बाहेर पडले. मात्र यावेळी बसचे चालक राजू कैलास गिरी यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ बस थांबवली व सुदैवाने कोणतेही प्रकारची मोठी घटना टळली आहे.

चालकाच्या प्रसंगावधानाने सुमारे ५० ते ६० प्रवाशांचे प्राण वाचले. अचानक घडलेल्या घटनेमुळे एस.टी. बसमधील सर्व प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रवाशांनी एसटी बस चालक राजू कैलास गिरी यांचे आभार मानले. यावेळी जामनेरचे पत्रकार इमरान खान यांनी मदत कार्य केले. जुन्या बसमुळे ही घटना घडली असून आता तरी शासन स्तरावर तात्काळ नवीन बसेस द्यावे, अशी मागणी आता प्रवाशांनी यावेळी प्रतिक्रिया देताना केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.