⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेले, चाळीसगावातील घटना

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेले, चाळीसगावातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ ।  आतापर्यंत एटीएम फोडून रक्कम लांबवल्याच्या अनेक घटना घडल्या; मात्र आता एटीएमचे मशीनच गायब करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चाळीसगावातील टाकळी प्र. चा. भागातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर असणारे स्टेट बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेल्याचा प्रकार आज बुधवार पहाटे एक ते दोनच्या सुमारास घडला.

एटीएम हे अत्यंत गजबजेल्या भागात आहे. चोरट्यांनी काचेचा दरवाजा फोडून मशीन लांबविले आहे.  मंगळवारी दुपारी या एटीएममध्ये १७ लाखाची रोकड भरल्याची माहिती मिळाली आहे. 

रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला चोरीची घटना लक्षात आली. रात्री दोन वाजेपासून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड पथकासह परिसर पिंजून काढला. तसेच काही ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत असता या चोरीच्‍या प्रकारात दोन चारचाकी गाड्यांचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

त्यांनी गाळेधारकाला उठवून पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनाही ही घटना कळवली. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली आहे.  

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.