---Advertisement---
गुन्हे पारोळा

लूटप्रकरणी संशयिताची काढली धिंड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । ट्रक लूटप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयितसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरी केलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. संशयिताची पारोळा पोलिसांनी शहरातून धिंड काढली.

crime 2022 06 13T151851.420

सचिन शालिक गायकवाड (रा. मडक्या मारुती चौक, पारोळा) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्कुटी पेप (क्र.एमएच १९-बी.के.९७११) पंचांसमक्ष काढून दिली. या गुन्ह्यातील संशयित ज्‍योतीबाई गोपी पाटील यांनी त्यांचे आणखी तीन साथीदारांसह मागील महिन्यात दोन ट्रक लूटले होते. संशितांच्या तीन साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. संशयित सचिन गायकवाड व ज्‍योतीबाई पाटील यांना पारोळा पोलिसांनी ११ रोजी अटक केली. दोन्ही संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक राजू जाधव, शेखर डोमाळे, सहाय्यक फौजदार जयवंत पाटील, कॉन्स्टेबल राहुल कोळी, आशिष गायकवाड, अनिल वाघ, किशोर पाटील यांनी कारवाई केली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---