महाराष्ट्र

मद्यशौकिनांना राज्य सरकारचा झटका! बार, रेस्टॉरंट, क्लबमधील मद्यदरात होणार वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्यशौकिनांना राज्य सरकारने झटका दिला असून सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

बारमधील मद्यदरात वाढ होणार असली तरी स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तेथील व्हॅट आधीपासूनच २० टक्के इतका आहे.

सरकारने आधीच अबकारी परवाना शुल्क वाढवल्याने व्यावसायावर ताण आलेला असताना आता व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने मद्याचे दर वाढणार असून याचा व्यावसायावर परिणाम होणार आहे, असं बारचालकांचं म्हणणं आहे. घेतल्याने आपल्या उद्दिष्टांना धक्का पोहोचणार असल्याचं मतही बारचालकांनी व्यक्त केलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button