जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | वो उर्दू का मुसाफिर है यही पहचान है उसकी | जहां से भी गुजरता है सलीका छोड़ जाता है | सलीके से हवाओं में जो खुशबू घोल सकते हैं | अभी कुछ लोग बाकी है जो उर्द्दू बोल सकते हैं |
वर्षानुवर्षांपासून उर्दू मुशायरा मध्ये हा उर्दूचा शेर म्हटला जातो कारण उर्दू भाषा टिकावी यासाठी कित्येक सौंस्था पुढाकार घेत आहेत. यातच राज्य शासनाने देखील पुढाकार घेतला आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार सुमारे सव्वालाख उर्दू भाषिकांची संख्या असलेल्या शहरात उर्दू घर बांधण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. यात मुंबई शहर , मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, परभणी, अकोला, जळगाव, बीड, धुळे, पुणे, बुलढाणा या शहरांमध्ये अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे उर्दू घर बांधण्यात येणार आहे.
उर्दू भाषा जोपासण्यासाठी राज्य शासनाने केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. उर्दू घराच्या बांधकामासाठी कोणतेही कायदेशीर व इतर वाद नसलेली किमान अडीच हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून द्यावी व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जागेवर उर्दू घर बनवावे असा मानस राज्य शासनाचा आहे यामुळे उर्दू भाषेचे संवर्धन होणार आहे