⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | गुडन्यूज : यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

गुडन्यूज : यावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२१ । राज्यासह बहुतांश जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यात जळगाव जिल्ह्यातही संसर्ग मोठ्या प्रमाणत कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्या पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. 

त्याचसोबत कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य (अहमदनगर), नांदूर-मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (नाशिक), अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य (धुळे) देखील खुली करण्यात आले असल्याचे वन्यजीव संरक्षक अ. मो. अंजनकर (नाशिक) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे. दरम्यान, यावेळी राज्य शासनाच्या महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्णयानुसार कोरोना विषाणूबाबतच्या नियमांचे पालन करावे लागेल. 

ही अभयारण्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल, 2021 पासून पर्यटनासाठी बंद करण्यात आली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.