⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

दरोडेखोरांनी महिलेचे दागिने तर लुटले, पण.. खान्देशातील खळबळजनक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२३ । धुळे जिल्ह्यातील साक्री येथून दरोड्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकू आणि बंदुकीचा महिलेला धाक दाखवून दागिन्यांसह महिलेच्या २३ वर्षीय भाचीला दरोडेखोरांनी पळवून नेले. निशा शेवाळे (२३) असे अपहरण करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून ही खळबळजनक घटना साक्री शहरातील सरस्वती नगरात घडली.

याबाबत असे की नीलेश पाटील हे आपल्या कुटुंबासह शहरात राहतात. काही कामानिमित्त पाटील हे संगमनेर येथे गेले असता त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना या घरी एकट्या असल्याने त्यांनी भाची निशा शेवाळे हिला झोपण्यासाठी घरी बोलावून घेतले. निशा व ज्योत्स्ना रात्री जेवण करून गप्पा करत बसल्या असता रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दार ठोठावण्याचा आवाज आला. यावेळी त्यांनी दार उघडताच एक दरोडेखोराने घरात प्रवेश केला.

त्या पाठोपाठ चार दरोडेखोर घरात आले. ते हिंदी भाषा बोलत होते. घरात येताच चाकूचा धाक दाखवित त्यांनी ज्योत्सना पाटील यांना दागिने कुठे आहे असे विचारले. त्यांनी तिजोरीतून ८८ हजार ५०० रूपयांचे दागिने काढून घेतले. व त्यांच्या अंगावरील दागिनेही हिसकावून घेतले. सोबत घरात असलेल्या महिलेच्या २३ वर्षीय भाची निशा‎ शेवाळे हिचे हात बांधून ‎तिचे अपहरण केले.‎ दरोडेखोर रात्री साक्री ‎शहरालगत असलेल्या‎ बायपास रस्त्याने पसार‎ झाले. काही वेळातच ही ‎बातमी शहरात पसरली.‎ माहिती मिळताच‎ घटनास्थळी पोलिस‎ पोहोचले व त्यांनी‎आरोपींचा माग काढण्याचा ‎प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत‎ आरोपी तपार झाले.‎

अपहरण झालेल्या तरुणीच्या मोबाइलवरून पोलिसांनी कॉल डिटेल्स काढले आहेत. त्यावरून तिच्याशी सर्वाधिक संभाषण झालेल्या ६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे उशिरा पर्यत चौकशी सुरू होती. गुन्ह्याची लवकर उकल व्हावी या उद्देशाने साक्री उपअधीक्षक यांचे दोन तर धुळे एलसीबीचे तीन अशी पाच पथक तयार करण्यात आली आहे. सर्व पथके धुळे जिल्ह्यासह मध्य प्रदेश व गुजरात राज्यात पाठवण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी या पथकाच्या संपर्कात आहे. दरम्यान, हा दरोडा पडल्यानंतर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेने सर्वच ठाण्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.