सोन्याचा नवा विक्रम ; जळगावमध्ये प्रति तोळा सोन्याचा इतका आहे दर

सप्टेंबर 5, 2025 3:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सप्टेंबर २०२५ । सोन्याच्या किंमती दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. दरम्यान आज ५ सप्टेंबर रोजी सकाळी बाजार उघडताच सुवर्णपेठ जळगाव मध्ये सोने दरात प्रति तोळा ५१० रुपयांची वाढ नोंदवली. याचबरोबर चांदीच्या दरातही पुन्हा १०३० रूपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा तोळा आता १ लाख ६ हजाराच्या वर गेला आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहे. तुम्हीही आज खरेदीला सराफ बाजारात जाणार असाल त्यापूर्वी दर तपासून घ्या..

ganpati visarjan 1

जळगावमध्ये सोन्याच्या दरात शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच ५०९ रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १० हजार १०१ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. सोन्याने प्रथमच एक लाख १० हजाराचा आकडा ओलांडला आहे.

जळगावमध्ये गेल्या चार दिवसांपासून चांदीचे दर एक लाख २७ हजार ७२० रूपयांपर्यंत स्थिर होते. मात्र, शुक्रवारी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो उच्चांकी एक लाख २८ हजार ७५० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.

सोने – चांदी दरवाढीची ही आहेत कारणे

एकीकडे गणेशोत्सव सुरु असून आगामी नवरात्री, दसरा आणि दिवाळी सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. मात्र त्यापूर्वी सोने आणि चांदीच्या दराने ऐतिहासिक पातळी गाठली. या दरवाढीमागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे, सणासुदीच्या हंगामापूर्वी (दसरा, दिवाळी) सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे तेजी

अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळले आहेत. कमकुवत अमेरिकन अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझर्व्हकडून मिळणारे संकेत यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील तणाव आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता यामुळेही गुंतवणुकदारांनी सोन्यात गुंतवणूक वाढवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now