उपकरणे : मफिन ट्रे, मिश्रणासाठी कटोरी.
साहित्य : १/२ कप भाजलेले ज्वारीचे पीठ, १/४ कप सत्तूचे पीठ, १/४ कप पालक प्युरी, चिरलेली ब्रोकोली, ३/४ कप पाणी, १ टेबल स्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, २ टी स्पून जवस पावडर (४ चमचे पाणी घाला आणि ते जेलसारखे होईपर्यंत फेटून घ्या), १ चमचे लिंबाचा रस
१/२ टी स्पून जिरे पावडर, १/२ टी स्पून मीठ, १/४ टी स्पून लाल तिखट, १/८ टी स्पून हळद, १/८ टी स्पून काळी मिरी पावडर, १/८ टी स्पून ओवा.
कृती :
● ओव्हन 180 डिग्री पर्यंत गरम करा.
● मफिन ट्रेला तूप किंवा तेल लावून बाजूला ठेवा.
● ज्वारीचे पीठ आणि सत्तूचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या.
● जवस पावडरमध्ये पाणी मिसळून जेल बनवा.
● एका भांड्यात ज्वारीचे पीठ, सत्तूचे पीठ घ्या.
● आता इतर कोरडे साहित्य घाला.
● शेवटी ब्रोकोली आणि पालक घालून मिक्स करा.
● आवश्यकतेनुसार लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल आणि शेवटी पाणी घालून पिठ बनवा.
● मफिन ट्रे मध्ये तयार पीठ भरा आणि २० ते २५ मिनिटे बेक करा.
● टूथपिक वापरून एकदा मफिन तपासा, जर पिठात चिकटले तर आणखी काही मिनिटे बेक करा.
● ट्रे काढा आणि काढण्यापूर्वी १० मिनिटे थंड होऊ द्या.
● गरमा-गरम सर्व्ह करा.
टीप : तुम्ही या रेसिपीसाठी नाचणीचे पीठ किंवा कोणतेही ग्लूटेन मुक्त पीठ वापरू शकता. हंगामानुसार मिश्र भाज्या घाला. जवस ऐवजी अंडीही घेता येतात. सत्तू फायबर, प्रथिने, लोह, मॅंगनीज आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे. ज्वारीचे पीठ कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम मुबलक असते.