जळगाव महापालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग ; आज इतके अर्ज दाखल?

डिसेंबर 27, 2025 6:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२५ । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज विक्री प्रक्रियेनंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान आज एकाच दिवशी तब्बल २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून २३५ इच्छुक उमेदवारांनी अर्जांची खरेदी केल्याने महापालिका निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. महापालिकेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दोन दिवसात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

jalgaon manapa

या प्रभागांसाठी उमेदवारी अर्जाची विक्री
आज प्रभागनिहाय अर्ज विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. प्रभाग क्रमांक १ मधून १०, प्रभाग क्रमांक २ मधून २६, प्रभाग क्रमांक ३ मधून १२, प्रभाग क्रमांक ४ मधून १५, प्रभाग क्रमांक ५ मधून ६, प्रभाग क्रमांक ६ मधून १५, प्रभाग क्रमांक ७ मधून २, प्रभाग क्रमांक ८ मधून ६, प्रभाग क्रमांक ९ मधून १२, प्रभाग क्रमांक १० मधून ८, प्रभाग क्रमांक ११ मधून १३, प्रभाग क्रमांक १२ मधून ११, प्रभाग क्रमांक १३ मधून २३, प्रभाग क्रमांक १४ मधून १४, प्रभाग क्रमांक १५ मधून ७, प्रभाग क्रमांक १६ मधून १४, प्रभाग क्रमांक १७ मधून २१, प्रभाग क्रमांक १८ मधून ८ तर प्रभाग क्रमांक १९ मधून १२ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, आज दाखल झालेल्या २४ अर्जांचा विचार करता प्रभाग क्रमांक १ मधून १, प्रभाग क्रमांक २ मधून २, प्रभाग क्रमांक ७ मधून १, प्रभाग क्रमांक १२ मधून ३, प्रभाग क्रमांक १३ मधून ४, प्रभाग क्रमांक १५ मधून ४, प्रभाग क्रमांक १६ मधून ६, प्रभाग क्रमांक १७ मधून १ आणि प्रभाग क्रमांक १८ मधून २ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवारांचा वाढता प्रतिसाद महापालिका निवडणुकीतील चुरस अधिक तीव्र होत असल्याचे संकेत देत आहे.

राजकीय पक्षांचीदेखील हालचाल वाढली असून भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ मधून उज्ज्वला बेंडाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रभाग क्रमांक १३ मधून शिंदे गटाकडून ज्योती चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now