गुरूवार, जून 8, 2023

नुकसान भरपाई वसुलीसाठी राबवलेली प्रक्रिया कायदेशीर नाही !

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । महापालिका मालकीच्या शहरातील व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळेधारकांचा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. त्यात गत काळात महापालिकेने नुकसान भरपाई वसुलीसाठी राबवलेली प्रक्रिया कायदेशीर नसल्याचा दावा शहरातील शंभरपेक्षा जास्त गाळेधारकांनी केला आहे.

मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापूर्वी मनपाने गाळेधारकांनी गाळा ताब्यात ठेवल्याने नुकसान झाल्याने कलम ८१ ‘क’नुसार भरपाईसाठी अंमलबजावणी केली होती.

त्यात बऱ्याच गाळेधारकांनी पैसेही भरले आहेत. दरम्यान, मनपाने कलम ८१ ‘क’ची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार केली नाही. गाळेधारकांना द्यायच्या नोटीस स्थायी समितीत मंजूर केली नाही. उपायुक्तांनी थेट आदेश बजावून सक्तीने वसुली केल्याचे गाळेधारक प्रदीप मंडोरा यांनी सांगितले. गांधी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोमया यांनी मनपाच्या या बेकायदेशीर प्रक्रियेला थेट मंत्रालयात आव्हान दिले आहे. शहरातील शंभरापेक्षा जास्त गाळेधारकांनी शासनाच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.